पैठणी साडी म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे . पैठणी साड्यांची मोहक रंगसंगती, आकर्षक नक्षीकाम आणि उत्कृष्ट हस्तकलेमुळे तिला "साड्यांची महाराणी" असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात पैठणीला विशेष स्थान आहे. लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव, मुंज, डोहाळजेवण किंवा इतर शुभकार्यांमध्ये पैठणी साडी नेसणे हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचे आहे . मात्र ही सुंदर साडी तयार होण्यासाठी अनेक r दिवसांची मेहनत, कुशल कारागिरांचे कौशल्य आणि अत्यंत बारकाईने केलेले काम लागते. पैठणीचा इतिहास महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या शहरावरून पैठणी साडीचे नाव पडले आहे. प्राचीन काळातीलसातवाहन राजांच्या काळात पैठण हे व्यापार आणि संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र होते. त्या काळात येथील रेशमी वस्त्रे आणि हातमागावरील साड्या देश-विदेशात प्रसिद्ध होत्या. काही काळानंतर पैठणीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि ही साडी "पैठणी" म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली. पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया आणि श्रीमंत कुटुंबातील महिला पैठणी नेसत असत. ...
मकरसंक्रांत हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी संक्रांत साजरी केली जाते. हा सण नवीन ऋतूचे, नवीन आशेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. भारताच्या विविध भागांमध्ये संक्रांत वेगवेगळ्या पद्धतींनी साजरी केली जाते. महाराष्ट्रात संक्रांत म्हटले की तीळगूळ, हळदीकुंकू, वाण आणि पारंपरिक पोशाख अशी सुंदर परंपरा डोळ्यांसमोर येते.या सणाशी जोडलेली एक विशेष आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे " काळ्या रंगाची साडी ." परंपरेनुसार, आपल्या सणांमध्ये काळा रंग शुभ मानला जात नाही. त्यामुळे लग्न, पूजाविधी किंवा धार्मिक सणांमध्ये काळा रंग टाळला जायचा. मात्र मकरसंक्रांत हा सण याला अपवाद ठरला आहे. संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे, विशेषतः काळी साडी नेसण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. ...