Skip to main content

Floral Jewellery fo Mehandi Occasion मेंदी समारंभासाठी फुलांचे दागिने

 

मेंदी समारंभासाठी फुलांचे दागिने   :

फ्लोरल ज्वेलरी -  प्रकार, डिझाइन आणि ट्रेंड.


भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रात, हळदी आणि मेंदी समारंभाला खूप महत्त्व आहे. आणि त्याची आवड असल्याने ते साजरे केले जातात.

वधू आणि वर यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाची    ही  सुरवात असते . पूर्वी मेंदी संगीत याचे स्वरूप साधे होते.

त्याला इव्हेंट चे स्वरूप आले नव्हते. परंतु आजच्या काळात, मेहेंदी आणि संगीत हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात .

मेंदी आणि हळदीच्या कार्यक्रमात तर वेगळ्या प्रकारे, ड्रेस किंवा साडी पासून ज्वेलरी पर्यंत निवड करून वधूला सजवतात.

 

या सोहळ्यांना अधिक आकर्षक आणि पारंपरिक रूप देण्यासाठी "फुलांच्या दागिन्यांचा" म्हणजेच "फ्लोरल ज्वेलरी" चा   वापर केला जातो. यासाठी  खऱ्या फुलांचे दागिने वापरतात . यामुळे हे केवळ सौंदर्य वाढत नाही,एक फ्रेश लुक मिळतो .

परंतु याचबरोबर कृत्रिम म्हणजेच आर्टिफिशियल फ्लोरल ज्वेलरी जास्त वापरतात. यात असंख्य प्रकार पाहायला मिळतात.   फुलांच्या दागिन्यांची मागणी वाढली असून, त्यात अनेक नवीन प्रकार आणि ट्रेंड आले आहेत.

 

ताज्या फुलांचे दागिने का निवडावे?

फुलांचे दागिने निवडण्यामागे अनेक कारणे आहेत.

  • नैसर्गिक सौंदर्य: ताजी फुले, त्यांचा सुगंध ,रंग नेहमीच एक वेगळाच मोहकपणा देतात. त्यांत्यामुळे नवरी खूप छान दिसते .
  • हलके आणि आरामदायक: पारंपरिक सोन्या-चांदीच्या दागिन्यांपेक्षा फुलांचे दागिने हलके असल्यामुळे ते जास्त काळ घालणे सोपे आणि सुटसुटीत असते ,मेंदी आणि हळदीसारख्या उत्साहाच्या समारंभांसाठी ते    वापरायला फारसा त्रास पडत नाही . आणि लुक छान दिसतो.
  • शुभ मानले जाते: फुले, भारतीय संस्कृतीत शुभ मानली जातात अनेक सण -उत्सवामध्ये    फुले हा अविभाज्य घटक आहे . फुले हे सौन्दर्य आणखी वाढवतात.
  • फोटोसाठी आकर्षक: फुलांचे दागिने घातल्याने नवरी खूप सुंदर दिसते फोटो तर फारच सुंदर येतात आणि एक नैसर्गिक लुक येतो.



  • मेंदीसाठी फुलांच्या दागिन्यांचे प्रकार

मेंदी समारंभासाठी अनेक प्रकारचे ताजे किंवा कृत्रिम किंवा आर्टिफिशिअल फुलांचे दागिने उपलब्ध आहेत,जे वधूच्या ड्रेसला किंवा साडीला पूरक ठरतात.

 

  • कृत्रिम फुलांचे दागिने (Artificial Floral Jewellery): आता केवळ ताजी फुलेच नव्हे, तर उच्च दर्जाच्या कृत्रिम फुलांचे दागिनेही बाजारात उपलब्ध आहेत. हे दागिने टिकाऊ असतात आणि समारंभाच्या काही दिवस आधीही खरेदी करता येतात.
  •  विशेषतः ज्यांना फुलांची ॲलर्जी आहे किंवा ज्यांना दागिने नंतरही जपून ठेवायचे आहेत, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

  • फुलांच्या दागिन्यांच्या डिझाइन्सचे प्रकार

 

1.    फुलांचे हार : मेंदीच्या ड्रेसवर    किंवा साडीवर ताज्या किंवा कृत्रिम फुलांचे हार खूप सुंदर दिसतात. यात विविध प्रकारची फुले वापरली जातात. काही हार मोठे आणि भरगच्च असतात, तर काही नाजूक आणि बारीक फुलांचे बनवलेले असतात. नेकलेस , चोकर किंवा लांब हार असे अनेक डिझाईन्स मिळतात .

2.    फुलांचे झुमके किंवा कर्णफुले : कानात घालण्यासाठी फुलांचे "झुमके"किंवा ज्याला स्टड्स म्हणतात ते खूप आकर्षक दिसतात. या फुलांच्या दागिन्यांमध्ये लहान गुलाबाची फुले, डेझी किंवा ऑर्किड्स च्या फुलांचा वापर करून हे बनवले जातात. यामध्ये मोती आणि फुलांचा वापर करून बनवलेले   झुमके    सुद्धा फार सुंदर दिसतात आणि ते ट्रेंडमध्ये आहेत.


3.    फुलांचे हातफूल/कंगन : मेंदी सोहळ्यासाठी फक्त इयर रिंग्स आणि नेकलेस नाही तर हातात घालण्यासाठी फुलांचे  "हातफूल किंवा कंगन" हे देखील महत्वाचे आहे . हे फुलांच्या माळांनी बनवलेले असतात, यामध्ये. बोटांमध्ये घालण्यासाठी अंगठ्याही जोडलेल्या असतात. आधीच नववधूच्या हातावर एवढी सुंदर मेंदी असते आणि त्यात हे हात फुल आणि फुलांची अंगठी यामुळे वधूच्या हाताचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते .

4.    केसांसाठी फुले: पारंपरिक गजरा असो वा केसांमध्ये अडकवण्यासाठी छोटी फुले, मेंदीसाठी केसांची सजावट फुलांशिवाय अपूर्ण आहे. मोकळ्या केसांमध्ये लावलेली आकर्षक फुले वधूच्या सौंदर्यात भर घालतात. वधूची हेअर स्टाईल जर वेगळी असेल किंवा अंबाडा घातला असेल तर त्या भोवती अशा प्रकारच्या फुलांची वेणी देखील मिळते आणि ती पण खूप सुंदर दिसते .

5.    फुलांचा मुकुट किंवा हेडबँड : हा एक लोकप्रिय प्रकार आहे,  ज्यात विविध रंगांच्या फुलांचा वापर करून डोक्यावर घालण्यासाठी मुकुट किंवा हेडबँड बनवला जातो. यामध्ये गुलाब, मोगरा, जाई, जुई, शेवंती, झेंडू यांसारख्या फुलांचा वापर केला जातो.

6.    फुलांचे पैंजण : पायांमध्ये फुलांचे पैंजण घातल्याने वधूचा लुक पूर्ण होतो. हे मोगरा, गुलाब किंवा इतर लहान सुगंधी फुलांनी बनवलेले असतात. कृत्रिम फुलांचे ही पैंजण मिळतात. वधूच्या पायावर सुद्धा मेंदी काढलेली असते. त्यामुळे अधिकच सुंदर दिसते.

7.    फुलांचे कलीरे : कलीरे हा फुलांच्या आणि मोत्यांच्या दागिन्यांचा एक प्रकार आहे जो पंजाब मध्ये प्रसिद्ध आहे . आता महाराष्ट्रातही ते लोकप्रिय झाले आहेत. फुलांचे कलीरे हातांना एक पारंपरिक आणि सुंदर लुक देतात. यात लहान फुले आणि मोत्यांचा वापर केलेला असतो .

8.    फुलांचा कमरपट्टा : यामध्ये फुलांचा कमरपट्टा बनवून मिळतो . साडी किंवा लेहेंग्यावर तो खूप छान दिसतो. यात मोठ्या फुलांचा किंवा फुलांच्या वेलींचा वापर केला जातो

Floral Jewellery fo Mehandi Occasion मेंदी समारंभासाठी फुलांचे दागिने
                 
   
   
   Floral Jewellery


डिझाइन्स आणि ट्रेंड (Designs and Trends):

आजकाल फुलांच्या दागिन्यांमध्ये नवनवीन डिझाइन्स आणि ट्रेंड दिसून येत आहेत.

  • पेस्टल रंगांची निवड: यासाठी केवळ डार्क कलरची फुले वापरतात असे नव्हे, तर पेस्टल रंगांची उदा. बेबी पिंक ,डार्क गुलाबी (Magenta), लॅव्हेंडर, पिस्ता, डार्क ग्रीन, फुलेही दागिन्यांसाठी खूप पसंत केली जातात. ह्यामुळे वधू नाजूक दिसतेच पण आधुनिक लुक येतो.
  • मिश्रित फुलांचा वापर : यामध्ये एकाच फ्लोरल ज्वेलरी सेट मध्ये अनेक प्रकारच्या फुलांचा आणि रंगांचा वापर करणे हा नवा ट्रेंड आहे. उदा. गुलाब, मोगरा आणि बेबीज ब्रेथ(Baby's Breath)अश्या सर्व प्रकारची मिक्स करून फुलांचे दागिने बनवतात .
  • शेल्स आणि मोत्यांचा वापर : आता फुलांच्या दागिन्यांमध्येही अनेक प्रकारे चेंजेस केले जातात .फुलांसोबत शेल्स (शंख) आणि मोत्यांचा वापर करून दागिन्यांना एक वेगळाच ट्विस्ट दिला जात आहे. हे दागिने म्हणजे पारंपरिक आणि आधुनिकतेचे उत्तम मिश्रण दिसते.
  • गोटा पट्टीचा वापर: गोटा पट्टीचा वापर काही फुलांच्या दागिन्यांमध्ये केला जातो त्यामुळे ते खूप सुंदर दिसते. म्हणजेच ट्रॅडिशनल गोटा पट्टीचा वापर करून देखील दागिने तयार करता येतात .
  • मिनिमलिस्टिक डिझाइन्स: काही वधू साध्या आणि मिनिमलिस्टिक डिझाइन्स (Minimalistic Designs) पसंत करतात. यात कमी फुलांचा वापर करून नाजूक दागिने बनवले जातात, जे साधेपणा आणि सौंदर्य यांचा मिलाफ दर्शवतात.
  • थीम-आधारित दागिने (Theme-Based Jewellery): काही जणी त्यांच्या मेंदी समारंभाच्या थीमनुसार फुलांचे दागिने बनवून घेतात. उदा. जर मेंदी सोहळ्यासाठी   थीम हिरवी असेल, तर हिरव्या रंगाच्या फुलांचा वापर अधिक केला जातो.


फुलांचे दागिने निवडताना विचारात घेण्यासारख्या गोष्टी:

  • पोशाखासोबत जुळणारे रंग: तुमच्या मेंदीच्या ड्रेसच्या रंगाशी जुळणारे किंवा त्याला पूरक असलेले फुलांचे रंग निवडले तर अधिक चांगले .
  • सीझन: जर ताज्या फुलांचे दागिने त्यावेळी समारंभात वापरणार असाल तर हंगामानुसार उपलब्ध असलेल्या फुलांची निवड करणे चांगले. उदा. हिवाळ्यात गुलाब आणि उन्हाळ्यात मोगरा.
https://amzn.to/45g2CSs
    Floral Jewellery 

  • आरामदायकता: दागिने जास्त जड असतील तर ते मेहंदी समारंभ संपूर्णपणे पार पडेपर्यंत घालणे थोडे त्रासदायक होऊ शकते. म्हणून दागिने जास्त जड नसावेत, जेणेकरून तुम्हाला ते जास्त काळ घालता येतील.
  • प्रसंगाचे स्वरूप: साधारणपणे मेंदी समारंभ दिवसा असतो, त्यामुळे हलक्या रंगांची फुले अधिक आकर्षक दिसतात.

मेंदी समारंभासाठी फुलांचे दागिने/ फ्लोरल ज्वेलरी हि केवळ एक फक्त फॅशन नसून, ते आनंद, आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहेत. आधुनिक काळात फुलांच्या दागिन्यांनी वधूंच्या

मनात खास स्थान निर्माण केले आहे. या दागिन्यांमुळे मेंदी सोहळा अधिक आनंददायी , रंगीबेरंगी आणि अविस्मरणीय बनतो


Comments

Popular posts from this blog

Mehndi Event मेंदी समारंभ - एक आनंदोत्सव

                                                                  मेंदी - भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग भारतीय संस्कृतीत, विशेषतः लग्न समारंभात,साखरपुडा , आता तर प्रत्येक समारंभाला मेंदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मेंदी केवळ एक कला प्रकार नसून, मेंदी शुभ मानली जाते आणि आनंद, प्रेम व सौभाग्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. लग्नघरात मेंदीचा कार्यक्रम हा एक अविस्मरणीय सोहळा असतो, जिथे वधूच्या हातावर आणि पायांवर नक्षीदार काढली जाते. तसेच  वधू वरांकडील   स्त्रियांच्या मुलींच्या अगदी लहानापासून मोठ्या वयापर्यंतच्या   स्त्रियांच्या मुलींच्या हातावर मेंदी काढली जाते . ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मेंदीचा इतिहास खूप जुना आहे. वैदिक काळापासून मेंदी चा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून केला जात होता असे मानले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या, मेंदी ला एक पवित्र वनस्पती मानले जाते. अनेक परंपरांनुसार, मेंदी ...

How is henna powder prepared? मेंदी पावडर  कशी बनवली जाते ?

              भारतात मेंदी पावडर कशी तयार होते याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे: भारतात,विशेषतः राजस्थान, गुजरात आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये मेंदीची  मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. १. लागवड आणि कापणी: मेंदी हे एक झुडूपवर्गीय पीक आहे. याला उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. मेंदीची लागवड बियांपासून किंवा कलमांद्वारे केली जाते. मातीची चांगली मशागत करून त्यात सेंद्रिय खत मिसळून मेंदीची रोपे लावली जातात. रोपे लावल्यानंतर नियमित पाणी आणि खते दिली जातात. मेंदीची कापणी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात केली जाते. कुशल कामगार मेंदीची पाने काळजीपूर्वक कापतात. कापणीनंतर, पाने १८-२० तास उघडी ठेवली जातात आणि नंतर ढीग करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना काही काळ तसेच ठेवले जाते. २. पाने सुकवणे: कापणी केलेल्या मेंदीच्या पानांना सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाशात सुकवले जाते. त्यांना थेट कडक उन्हात सुकवल्यास त्यांचा रंग आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. पाने पूर्णपणे कोरडी होईपर्यंत पसरवून ठेवली जातात, जेणेकरून त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल. पाने पूर्णपणे सु...

Main Mehndi Designs मेहंदी डिझाईन्सचे काही प्रमुख नमुने

मेंदीमधील सर्वात सामान्य आणि सुंदर नमुने !! फुले आणि पाने (Floral and Leaf Motifs) : यामध्ये विविध प्रकारची फुले (कमळ, गुलाब, सूर्यफूल) आणि पाने (आंब्याची पाने) यांचा समावेश असतो. वेली (Vines/Creepers):   नाजूक आणि सुंदर वेली हातावर किंवा पायावर काढल्या जातात, ज्यामुळे एक मनमोहक लुक मिळतो मंडाला (Mandala):   यामध्ये हातावर मेंदी काढताना ,तळहाताच्या मध्यभागी एक वर्तुळाकार डिझाईन किंवा नक्षी काढली जाते,जी हळूहळू बाहेरच्या दिशेने मोठी होत जाते. हे डिझाईन खूप आकर्षक दिसते. कळस / कैरी (Paisley/Kairi): कळस किंवा कैरी हि डिझाईन मेंदी काढताना वापरली जातेच .  आंब्याच्या आकारासारखी दिसणारी कोयरी हा प्रकार भारतीय मेंदी मध्ये खूप प्रसिद्ध आहे. जाळी (Net/Jaali):   मेंदी काढताना अगदी बारीक डिझाईन काढायची असल्यास ,हातावर किंवा बोटांवर काढलेली जाळीदार डिझाईन खूप सुंदर आणि खूप कलाकुसरीची असते. अतिशय चिकाटीने हे डिझाईन काढले जाते . मोर (Peacock):  मोराची नक्षी हि मेंदी मध्ये विशेषतः भारतीय मेंदी डिझाईन मध्ये प्रसिद्ध आहे . सर्वांनाच हि डिझाईन ...