पैठणी साडी म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे . पैठणी साड्यांची मोहक रंगसंगती, आकर्षक नक्षीकाम आणि उत्कृष्ट हस्तकलेमुळे तिला "साड्यांची महाराणी" असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात पैठणीला विशेष स्थान आहे. लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव, मुंज, डोहाळजेवण किंवा इतर शुभकार्यांमध्ये पैठणी साडी नेसणे हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचे आहे . मात्र ही सुंदर साडी तयार होण्यासाठी अनेक r दिवसांची मेहनत, कुशल कारागिरांचे कौशल्य आणि अत्यंत बारकाईने केलेले काम लागते. पैठणीचा इतिहास महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या शहरावरून पैठणी साडीचे नाव पडले आहे. प्राचीन काळातीलसातवाहन राजांच्या काळात पैठण हे व्यापार आणि संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र होते. त्या काळात येथील रेशमी वस्त्रे आणि हातमागावरील साड्या देश-विदेशात प्रसिद्ध होत्या. काही काळानंतर पैठणीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि ही साडी "पैठणी" म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली. पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया आणि श्रीमंत कुटुंबातील महिला पैठणी नेसत असत. ...
मेंदी आर्ट .
ही केवळ एक कला नसून ती भावना, परंपरा आणि आनंदाचे प्रतीक आहे.
'Shraawe' या ब्लॉगवर तुम्हाला मेंदीच्या सुंदर डिझाईन्स, नवीनतम ट्रेंड आणि मेंदीशी संबंधित सर्व उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी वाचायला मिळेल. पारंपारिक भारतीय संस्कृतीत मेंदीचे महत्व आहे.
मेंदी फक्त हातांवर काढलेली नक्षी नसते, तर ती प्रत्येक शुभ प्रसंगाचा एक अविभाज्य भाग असते.
,
Comments
Post a Comment