मेंदीमधील सर्वात सामान्य आणि सुंदर नमुने !!
फुले आणि पाने (Floral and Leaf Motifs) :
यामध्ये विविध प्रकारची फुले (कमळ, गुलाब, सूर्यफूल) आणि पाने (आंब्याची पाने) यांचा समावेश असतो.
वेली (Vines/Creepers):
नाजूक आणि सुंदर वेली हातावर किंवा पायावर काढल्या जातात, ज्यामुळे एक मनमोहक लुक मिळतो
मंडाला (Mandala):
यामध्ये हातावर मेंदी काढताना ,तळहाताच्या मध्यभागी एक वर्तुळाकार डिझाईन किंवा नक्षी काढली जाते,जी हळूहळू बाहेरच्या दिशेने मोठी होत जाते. हे डिझाईन खूप आकर्षक दिसते.
कळस / कैरी (Paisley/Kairi):
कळस किंवा कैरी हि डिझाईन मेंदी काढताना वापरली जातेच . आंब्याच्या आकारासारखी दिसणारी कोयरी हा प्रकार भारतीय मेंदी मध्ये खूप प्रसिद्ध आहे.
मेंदी काढताना अगदी बारीक डिझाईन काढायची असल्यास ,हातावर किंवा बोटांवर काढलेली जाळीदार डिझाईन खूप सुंदर आणि खूप कलाकुसरीची असते. अतिशय चिकाटीने हे डिझाईन काढले जाते .
मोर (Peacock):
मोराची नक्षी हि मेंदी मध्ये विशेषतः भारतीय मेंदी डिझाईन मध्ये प्रसिद्ध आहे . सर्वांनाच हि डिझाईन आवडते. अतिशय सुंदर दिसत असल्याने आणि शुभ मानल्यामुळे अनेक मेंदी डिझाईन्समध्ये हि वापरली जाते.
विशेषतः वधूच्या मेहंदीमध्ये डोली, वधू-वर यांचे चित्र, किंवा इतर लग्नाशी संबंधित नक्षी काढली जाते .
मोर वगळता काहीवेळा , हत्ती, घोडा यांसारख्या प्राण्यांची चित्रेदेखील काढली जातात. हत्तीवरून पालखी अशी काही पौराणिक चित्रे हि काढतात .
प्रत्येक प्रकारच्या मेंदी ची स्वतःची अशी खास शैली आणि सौंदर्य आहे, ज्यामुळे ती वेगवेगळ्या प्रसंगांसाठी , उत्सवासाठी ,सण समारंभासाठी आवडीनुसार निवडली जाते.
धार्मिक चिन्हे (Religious Symbols):
स्वस्तिक, ओम, गणपती, कलश यांसारखी डिझाईन शुभ प्रसंगी वापरली जातात.
प्रत्येक प्रकारच्या मेंदी ची स्वतःची अशी खास शैली आणि सौंदर्य आहे, ज्यामुळे ती वेगवेगळ्या प्रसंगांसाठी , उत्सवासाठी ,सण समारंभासाठी आवडीनुसार निवडली जाते.
Comments
Post a Comment