मेंदी आर्ट
मेंदी कलेचा इतिहास (History of Mehndi Art) :
मेंदी ज्याला मेहेंदी / 'हिना' (Henna) देखील म्हणतात.
मेंदी हि एक प्राचीन कला आहे, जी अनेक वर्षांपासून विविध संस्कृतींमध्ये रुजलेली आहे. हातावर मेंदी काढण्याची परंपरा केवळ एक नुसती परंपरा नसून किंवा , विविध सणसमारंभ आणि सांस्कृतिक उत्सवांचा एक अविभाज्य भाग आहे. मेंदी हा स्त्रियांचा अत्यंत जिव्हळ्याचा , आवडीचा विषय आहे .
![]() |
मेंदी आर्ट |
उगम आणि प्राचीन काळातील मेंदीचे महत्व
- आफ्रिका आणि मध्यपूर्व: मेंदी कलेचा उगम इजिप्त आणि मध्यपूर्वेमध्ये झाला असे मानले जाते. राणी क्लियोपात्रा देखील सौंदर्यासाठी मेंदीचा वापर करत असे असे म्हटले जाते
- दक्षिण आशिया (भारत): भारतात मेंदी हातावर काढण्याला कधी सुरवात झाली याबद्दल निश्चित माहिती नाही, परंतु असे मानले जाते की ,१२ व्या शतकात मुघल साम्राज्या नंतर भारतात मेंदी कला अधिक लोकप्रिय झाली. मात्र, काही इतिहासकारांच्या मते, भारतात मेंदी वापर प्राचीन काळापासून, अगदी वेदकालीन संस्कृतीच्या काळापासून होत आला आहे.
- इतर प्रदेश: मध्य आशिया, आफ्रिकेतील काही भाग आणि अगदी युरोपमध्येही मेंदीचा वापर असावा असे अभ्यासकांचे मत आहे.
ऐतिहासिक वापर आणि महत्त्व:
- सजावट आणि सौंदर्य: सुरुवातीला मेंदी उपयोग केवळ सजावट म्हणून केला जात असे. हातांवर, पायांवर आणि मेंदीने विविध नक्षीकाम केले जात असे.
- धार्मिक आणि आध्यात्मिक: अनेक संस्कृतींमध्ये मेंदीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. भारतात हिंदू धर्मात लग्न, दिवाळी, करवा चौथ आणि ईद यांसारख्या सणांमध्ये मेंदी काढणे शुभ मानले जाते.
- औषधी गुणधर्म: मेंदी केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर तिच्या औषधी गुणधर्मांसाठी देखील वापरली जात असे. शरीराला थंडावा देणे, डोकेदुखी कमी करणे आणि त्वचेच्या काही समस्यांवर उपचार करण्यासाठी मेंदीचा उपयोग केला जात असे.
आधुनिक काळात मेंदी आर्ट :
आजही मेंदीची लोकप्रियता कायम आहे. किंबहुना ती जास्त वाढली आहे .
मात्र भारतात आणि जगभरात मेंदी केवळ सण आणि समारंभापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती एक फॅशन स्टेटमेंट बनली आहे. पारंपरिक डिझाईन्सव्यतिरिक्त, आधुनिक, फ्यूजन आणि अरेबिक डिझाईन्सही खूप लोकप्रिय झाले आहेत. टॅटूच्या या प्रकारात तात्पुरते डिझाईन्स काढण्यासाठीही मेंदीचा वापर केला जातो.
थोडक्यात, मेंदी कलेचा इतिहास हा संस्कृती, परंपरा आणि सौंदर्याचा एक सुंदर संगम आहे, जो हजारो वर्षांपासून स्त्रियांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
Comments
Post a Comment