नेल आर्ट (Nail Art) हा सध्या बराचसा प्रचलित आणि ट्रेंडिंग प्रकार आहे .
नेल आर्टचे प्रकार (Types of Nail Art):
1.पेंट नेल आर्ट (Paint Nail Art):
या नेलं आर्ट मध्ये नखांवर ब्रशच्या मदतीने विविध डिझाइन (नक्षीकाम), फुले,
पाने, आणि इतर डिझाईन किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी पेंट केल्या जातात.
हे काम खूप कौशल्याने करावे लागते. त्यासाठी नेल आर्टिस्ट विशेष ब्रश वापरतात. यासाठी ॲक्रेलिक पेंट किंवा खास नेल पेंट चा वापर केला जातो.
2. वॉटर मार्बल नेल आर्ट (Water Marble Nail Art):
हे एक खूप लोकप्रिय आणि सुंदर टेक्निक आहे. यात एका भांड्यात पाणी घेऊन त्यात वेगवेगळ्या रंगांचे नेल पेंटचे थेंब टाकले जातात. या थेंबांना सुईच्या किंवा टूथपिक च्या मदतीने फिरवून सुंदर डिझाइन तयार केले जाते. नख या डिझाइनमध्येबुडवले जाते (dip) आणि हे डिझाइन नखांवर घेतले जाते.
3. स्टॅंपिंग नेल आर्ट (Stamping Nail Art):
हा प्रकार सोपा आणि फास्ट आहे. यामध्ये खास तयार केलेले साचे (प्लेट) वापरले जातात, \ज्यावर आधीपासूनच वेगवेगळे नमुने (डिझाइन) कोरलेले असतात. या साच्यावर नेल पेंट लावतात आणि नेल स्टँपरच्या मदतीने हे डिझाईन नखांवर काढतात. हा प्रकार विशेषतः वेळ वाचवण्यासाठी आणि अवघड डिझाइन सोप्या पद्धतीने काढण्यासाठी वापरला जातो.
4. ग्लिटर नेल आर्ट (Glitter Nail Art):
यामध्ये नखांना ग्लिटर (चकाकी) पावडर किंवा ग्लिटर असलेल्या नेल पेंटने डिझाईन काढून सजवले जाते.हे डिझाईन ते नखांना चमकदार आणि आकर्षक बनवते . त्यामुळे हे आर्ट पार्टी, लग्न अश्या समारंभासाठी काढतात.
5. फ्रेंच मॅनीक्योर नेल आर्ट (French Manicure Nail Art):
हा एक क्लासिक (पारंपरिक) आणि डिसेन्ट प्रकार आहे. यामध्ये नखांना नैसर्गिक रंग (गुलाबी किंवा फिकट रंगाचा) दिला जातो आणि नखांच्या टोकांना पांढऱ्या रंगाने रंगवले जाते. हे अगदी साधे आणि सुंदर दिसते. आता या प्रकारातही वेगवेगळे बदल करण्यात आले आहेत, यात नखांच्या टोकांवर पांढऱ्या ऐवजी इतर रंग वापरले जातात.
नेल आर्टसाठी आवश्यक साहित्य (Necessary things for Nail Art):
नेल आर्ट ब्रश (Nail Art Brush): बारीक आणि जाड ब्रश जे नमुने काढण्यासाठी वापरले जातात.
नेल स्टँपिंग किट (Nail Stamping Kit): यात स्टँपिंग प्लेट्स, स्टँपर आणि स्क्रॅपर असतात.
नेलकटर आणि नेल फाइलर: नखांना आकार दिला जातो
नेल रिमूव्हर (Nail Remover): जुना नेल पेंट काढण्यासाठी वापरतात.
डॉटिंग टूल (Dotting Tool): छोटे गोल ठिपके किंवा फुले काढण्यासाठी याचा वापर करतात
नेल स्टिकर्स / राइनस्टोन्स (Nail Stickers / Rhinestones): नखांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी वापरतात.
बेस कोट (Base Coat): नखांना संरक्षण देण्यासाठी वापरला जाणारा पारदर्शक थर.
टॉप कोट (Top Coat): नेल आर्टला चमक आणि टिकाऊपणा देण्यासाठी वापरला जाणारा पारदर्शक थर.
नेल आर्टची प्रक्रिया (Nail Art Process):
1. नखांची तयारी:
सर्वात आधी जुने नेल पेंट रिमूव्ह करणे .
नखांच्या त्वचेला (क्युटिकल्स) थोडे फिनिशिंग करणे .
नखे पाण्याने स्वच्छ आणि कोरडे करणे.
2. बेस कोट लावणे:
यांनतर नखांवर सुरवातीला एक बेस कोट लावावा .
यामुळे नख खराब होणार नाहीत आणि नेल पेंट जास्त काळ टिकते.
3. नेल पेंटचा पहिला थर:
यानंतर आपल्या आवडीचा नाही पेंट लावूं तो सुकण्यासाठी ( dry) थोडा वेळ देणे
4. डिझाइन तयार करणे:
आता आवडीनुसार वरीलपैकी कोणतेही नाही आर्ट अप्लाय करू शकता
ब्रशने पेंट करू शकता, स्टँपिंग करू शकता किंवा स्टिकर्स वापरू शकता.
5. टॉप कोट लावणे:
डिझाइन पूर्ण झाल्यावर आणि ते पूर्णपणे सुकल्यावर, त्यावर एक टॉप कोट लावला जातो.
यामुळे नेल आर्टला चमक येते आणि ती अधिक काळ टिकते.
निष्कर्ष (Conclusion):
नेल आर्ट ही फक्त नखांना रंग देण्याची कला नसून, त्यामुळे व्यक्तिमत्वाला एक वेगळाच लुक देते. तुम्ही घरी स्वतःच्या नाही आर्ट करू शकता किंवा एखाद्या सलूनमध्ये जाऊन प्रोफेशनल नेल आर्ट करून घेऊ शकता.
नेल आर्टने तुमचे हात अधिक सुंदर दिसतात. यामध्ये कस्टमाइज्ड (Customized) हा पर्याय पण असतो.
एखाद्या समारंभासाठी , पार्टीसाठी तुमच्या ड्रेस वर साडी नुसार आर्ट करता येते.
आजकाल आर्टिफिशिअल नेल्स देखील मिळतात .पुढे दाखवल्याप्रमाणे ऑनलाइन किंवा ऑफलाईन देखील नेल्स मिळतात .
यासाठी ऑनलाईन खरेदीसाठी पर्याय असतात.
Comments
Post a Comment