मेंदीचे प्रमुख प्रकार (Types of Mehndi):
1. भारतीय मेंदी (Indian Mehndi):
ही सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक मेंदी आहे. यात डिझाईन्स खूप बारीक आणि कलाकुसरीच्या असतात, ज्यामुळे हात पूर्णपणे भरलेले दिसतात. यामध्ये मोर, फुले, पाने, वेली, देवी-देवतांच्या आकृती, शुभ चिन्ह (उदा. स्वस्तिक, ओम) यांचा समावेश असतो. नववधूंसाठी पूर्ण हातावर आणि पायांवर मेंदी काढली जाते .
प्रसिद्ध डिझाईन्स: ब्राइडल मेहंदी, पारंपरिक जाळीदार डिझाईन्स, मोर-नक्षी, कैरी पॅटर्न.
2. अरेबिक मेंदी (Arabic Mehndi):
ही मेंदी वेलीच्या (वेल ) स्वरूपात काढली जाते. यात ठळक रेषा आणि मोकळ्या जागा (space) अधिक असतात. पूर्ण हात भरण्याऐवजी, एका बोटापासून सुरू होऊन मनगटापर्यंत किंवा हाताच्या एका बाजूने सुंदर मेंदी ची नक्षी हातावर काढली जाते . ही डिझाईन पटकन काढता येते आणि दिसायला आकर्षक दिसते.
प्रसिद्ध डिझाईन्स: फुलांच्या आणि पानांच्या वेली, ठळक भूमितीय आकार, मोराची नक्षी.
3. मोरोक्कन मेंदी (Moroccan Mehndi):
ही मेंदी तिच्या भूमितीय (Geometric) आकारांसाठी आणि आदिवासी डिझाईन्ससाठी ओळखली जाते. यात त्रिकोण, चौकोन, रेषा आणि बिंदूंचा वापर जास्त केला जातो. ह्या मेंदी डिझाईन मध्यपूर्व आणि आफ्रिकन संस्कृतीत दिसून आल्या आहेत. इथे मेंदी आर्ट पुरुषांमध्येही लोकप्रिय आहे.
Comments
Post a Comment