Skip to main content

Featured post

How is Paithni Saree made? पैठणी साडी कशी बनते?

पैठणी साडी म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे . पैठणी साड्यांची मोहक रंगसंगती, आकर्षक नक्षीकाम आणि उत्कृष्ट हस्तकलेमुळे तिला "साड्यांची महाराणी" असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात पैठणीला विशेष स्थान आहे. लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव, मुंज, डोहाळजेवण किंवा इतर शुभकार्यांमध्ये पैठणी साडी नेसणे  हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचे आहे . मात्र  ही सुंदर साडी तयार होण्यासाठी अनेक r दिवसांची मेहनत, कुशल कारागिरांचे कौशल्य आणि अत्यंत बारकाईने केलेले काम लागते.   पैठणीचा इतिहास महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठण या शहरावरून पैठणी साडीचे नाव  पडले आहे.  प्राचीन काळातीलसातवाहन राजांच्या काळात पैठण हे व्यापार आणि संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र होते. त्या काळात येथील रेशमी वस्त्रे आणि हातमागावरील साड्या देश-विदेशात प्रसिद्ध होत्या.   काही काळानंतर  पैठणीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि  ही साडी "पैठणी" म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली.   पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया आणि श्रीमंत कुटुंबातील महिला पैठणी नेसत असत. ...

Types of Mehndi मेंदीचे प्रमुख प्रकार

 


मेंदीचे प्रमुख प्रकार (Types of Mehndi):


 

1.  भारतीय मेंदी (Indian Mehndi):


 ही सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक मेंदी आहे. यात डिझाईन्स खूप बारीक आणि कलाकुसरीच्या असतात, ज्यामुळे हात  पूर्णपणे भरलेले दिसतात. यामध्ये मोर, फुले, पाने, वेली, देवी-देवतांच्या आकृती, शुभ चिन्ह (उदा. स्वस्तिक, ओम) यांचा समावेश असतो.   नववधूंसाठी पूर्ण हातावर आणि पायांवर मेंदी काढली जाते .

    प्रसिद्ध डिझाईन्स:  ब्राइडल मेहंदी, पारंपरिक जाळीदार डिझाईन्स, मोर-नक्षी, कैरी पॅटर्न.

 

Types of Mehndi   मेंदीचे प्रमुख प्रकार

2.  अरेबिक मेंदी (Arabic Mehndi):

  ही मेंदी वेलीच्या (वेल ) स्वरूपात काढली जाते. यात ठळक रेषा आणि मोकळ्या जागा (space) अधिक असतात. पूर्ण हात भरण्याऐवजी, एका बोटापासून सुरू होऊन मनगटापर्यंत किंवा हाताच्या एका बाजूने सुंदर मेंदी ची नक्षी  हातावर  काढली जाते . ही डिझाईन पटकन काढता येते आणि दिसायला आकर्षक दिसते.

    प्रसिद्ध डिझाईन्स:  फुलांच्या आणि पानांच्या वेली, ठळक भूमितीय आकार, मोराची नक्षी.


Types of Mehndi   मेंदीचे प्रमुख प्रकार


 

3.  मोरोक्कन मेंदी (Moroccan Mehndi):

 ही मेंदी तिच्या भूमितीय (Geometric) आकारांसाठी आणि आदिवासी डिझाईन्ससाठी ओळखली जाते. यात त्रिकोण, चौकोन, रेषा आणि बिंदूंचा वापर जास्त केला जातो. ह्या मेंदी डिझाईन  मध्यपूर्व आणि आफ्रिकन संस्कृतीत दिसून आल्या आहेत. इथे मेंदी आर्ट  पुरुषांमध्येही लोकप्रिय आहे.

Types of Mehndi   मेंदीचे प्रमुख प्रकार


प्रसिद्ध डिझाईन्स: भूमितीय नमुने, आदिवासी डिझाईन्स, सममितीय पॅटर्न.

 




Comments

Popular Post

Mehndi Event मेंदी समारंभ - एक आनंदोत्सव

                                                                  मेंदी - भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग भारतीय संस्कृतीत, विशेषतः लग्न समारंभात,साखरपुडा , आता तर प्रत्येक समारंभाला मेंदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मेंदी केवळ एक कला प्रकार नसून, मेंदी शुभ मानली जाते आणि आनंद, प्रेम व सौभाग्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. लग्नघरात मेंदीचा कार्यक्रम हा एक अविस्मरणीय सोहळा असतो, जिथे वधूच्या हातावर आणि पायांवर नक्षीदार काढली जाते. तसेच  वधू वरांकडील   स्त्रियांच्या मुलींच्या अगदी लहानापासून मोठ्या वयापर्यंतच्या   स्त्रियांच्या मुलींच्या हातावर मेंदी काढली जाते . ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मेंदीचा इतिहास खूप जुना आहे. वैदिक काळापासून मेंदी चा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून केला जात होता असे मानले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या, मेंदी ला एक पवित्र वनस्पती मानले जाते. अनेक परंपरांनुसार, मेंदी ...

How is henna powder prepared? मेंदी पावडर  कशी बनवली जाते ?

              भारतात मेंदी पावडर कशी तयार होते याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे: भारतात,विशेषतः राजस्थान, गुजरात आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये मेंदीची  मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. १. लागवड आणि कापणी: मेंदी हे एक झुडूपवर्गीय पीक आहे. याला उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. मेंदीची लागवड बियांपासून किंवा कलमांद्वारे केली जाते. मातीची चांगली मशागत करून त्यात सेंद्रिय खत मिसळून मेंदीची रोपे लावली जातात. रोपे लावल्यानंतर नियमित पाणी आणि खते दिली जातात. मेंदीची कापणी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात केली जाते. कुशल कामगार मेंदीची पाने काळजीपूर्वक कापतात. कापणीनंतर, पाने १८-२० तास उघडी ठेवली जातात आणि नंतर ढीग करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना काही काळ तसेच ठेवले जाते. २. पाने सुकवणे: कापणी केलेल्या मेंदीच्या पानांना सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाशात सुकवले जाते. त्यांना थेट कडक उन्हात सुकवल्यास त्यांचा रंग आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. पाने पूर्णपणे कोरडी होईपर्यंत पसरवून ठेवली जातात, जेणेकरून त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल. पाने पूर्णपणे सु...

Main Mehndi Designs मेहंदी डिझाईन्सचे काही प्रमुख नमुने

मेंदीमधील सर्वात सामान्य आणि सुंदर नमुने !! फुले आणि पाने (Floral and Leaf Motifs) : यामध्ये विविध प्रकारची फुले (कमळ, गुलाब, सूर्यफूल) आणि पाने (आंब्याची पाने) यांचा समावेश असतो. वेली (Vines/Creepers):   नाजूक आणि सुंदर वेली हातावर किंवा पायावर काढल्या जातात, ज्यामुळे एक मनमोहक लुक मिळतो मंडाला (Mandala):   यामध्ये हातावर मेंदी काढताना ,तळहाताच्या मध्यभागी एक वर्तुळाकार डिझाईन किंवा नक्षी काढली जाते,जी हळूहळू बाहेरच्या दिशेने मोठी होत जाते. हे डिझाईन खूप आकर्षक दिसते. कळस / कैरी (Paisley/Kairi): कळस किंवा कैरी हि डिझाईन मेंदी काढताना वापरली जातेच .  आंब्याच्या आकारासारखी दिसणारी कोयरी हा प्रकार भारतीय मेंदी मध्ये खूप प्रसिद्ध आहे. जाळी (Net/Jaali):   मेंदी काढताना अगदी बारीक डिझाईन काढायची असल्यास ,हातावर किंवा बोटांवर काढलेली जाळीदार डिझाईन खूप सुंदर आणि खूप कलाकुसरीची असते. अतिशय चिकाटीने हे डिझाईन काढले जाते . मोर (Peacock):  मोराची नक्षी हि मेंदी मध्ये विशेषतः भारतीय मेंदी डिझाईन मध्ये प्रसिद्ध आहे . सर्वांनाच हि डिझाईन ...

Stylish Mehndi Dress मेंदी ड्रेस: सौंदर्य, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम

  मेंदी ड्रेस:   सौंदर्य, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम   भारतीय विवाहसोहळ्यात मेंदीचा कार्यक्रम हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा भाग असतो. या समारंभात वधूपासून ते नातेवाईकांपर्यंत सर्वच जण खास तयारी करतात आणि पारंपरिक वेशभूषेत नटून , आवडीप्रमाणे ड्रेस घालून येतात. मेंदी ड्रेस केवळ एक पोशाख नसून, तो   सौंदर्य, परंपरा आणि आधुनिकतेचा एक अनोखा संगम दर्शवतो. ह्या सोहळ्यची रंगत त्यामुळे अजूनच वाढते .  लोकल मार्केट मध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध असतात . पण हे ड्रेस ऑनलाईन देखील विकत घेता येतात . आजकाल, मेंदी ड्रेस केवळ वधूसाठीच नव्हे तर तिच्या मैत्रिणी, बहिणी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसाठी ही     एक     फॅशन      स्टेटमेंट      बनला     आहे . वधूचा मेंदी ड्रेस : मेंदीच्या दिवशी सर्व लक्ष वधूच्या ड्रेसकडे असते. पूर्वी वधू फक्त हिरव्या रंगाचे कपडे परिधान करत असे, पण आता फॅशनच्या बदलत्या ट्रेंडनुसार विविध रंग आणि शैलींचा स्वीकार केला जात आहे. वधूचा मेंदी ड्रेस आरामदायक आणि सुं...