मेंदी - भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग भारतीय संस्कृतीत, विशेषतः लग्न समारंभात,साखरपुडा , आता तर प्रत्येक समारंभाला मेंदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मेंदी केवळ एक कला प्रकार नसून, मेंदी शुभ मानली जाते आणि आनंद, प्रेम व सौभाग्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. लग्नघरात मेंदीचा कार्यक्रम हा एक अविस्मरणीय सोहळा असतो, जिथे वधूच्या हातावर आणि पायांवर नक्षीदार काढली जाते. तसेच वधू वरांकडील स्त्रियांच्या मुलींच्या अगदी लहानापासून मोठ्या वयापर्यंतच्या स्त्रियांच्या मुलींच्या हातावर मेंदी काढली जाते . ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मेंदीचा इतिहास खूप जुना आहे. वैदिक काळापासून मेंदी चा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून केला जात होता असे मानले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या, मेंदी ला एक पवित्र वनस्पती मानले जाते. अनेक परंपरांनुसार, मेंदी ...
एका चांगल्या शहरात , एका सोसायटीत सुमनताई आपल्या मुलगा अनिकेत आणि सून प्राजक्तासोबत राहत होत्या. सुमनताई पारंपरिक विचारांच्या असल्या तरी काळानुसार बदल स्वीकारणाऱ्या होत्या. प्राजक्ता आयटी कंपनीत नोकरी करत होती. सुनेला कामाच्या व्यापामुळे तिला अनेक सण-उत्सवांची माहिती फारशी नव्हती. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा जवळ आली होती. एक दिवस सकाळी सुमनताई पूजा साहित्याची यादी बनवत होत्या. प्राजक्ताने ते पाहिले. " आई , तुम्ही एवढी तयारी कशासाठी करता आहात ?" तिने विचारले . सुमनताई हसल्या . " अगं , पुढच्या आठवड्यात वटसावित्री पौर्णिमा आहे ना ! त्यासाठी तयारी करते आहे." प्राजक्ता थोडी संकोचून म्हणाली , " आई , मला खरं सांगायचं तर या व्रताबद्दल फारशी माहिती नाही ." " मग छानच . आज तुला सगळं सांगते ," असे म्हणत सुमनताईंनी तिला आपल्या जवळ बसवले . " वटसावित्री व्रत हे महाराष्ट्रातील विवाहित स्त्रिया मोठ्या श्रद्धेने करतात . या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची कथा आहे ." ...