मंगळागौरीच्या ओव्या महाराष्ट्रामध्ये मंगळागौर हा स्त्रियांचा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया देवी गौरीची पूजा करतात. पूजनानंतर फुगड्या, झिम्मा, विविध पारंपरिक खेळ आणि ओव्या परंपरा असून रात्रभर कार्यक्रम केला जातो . मंगळागौरीच्या ओव्या या महाराष्ट्राच्या लोकसाहित्याचा अमूल्य ठेवा आहेत. या ओव्यांमधून स्त्रियांच्या भावना, श्रद्धा, नातेसंबंध आणि सांस्कृतिक परंपरा व्यक्त होतात. मंगळागौरीच्या ओव्यांमध्ये देवी गौरीची स्तुती, संसारातील सुखाची कामना, माहेर-सासरचे प्रेम, निसर्गाचे सौंदर्य आणि स्त्रियांच्या जीवनातील विविध अनुभवांचे सुंदर चित्रण आढळते. उदाहरणार्थ, पुढील ओव्या आजही अनेक ठिकाणी म्हटल्या जातात— "आली आली मंगळागौर, सोन्याच्या पायघड्या घालून। गौरी आली घरोघरी, सुख-समृद्धी घेऊन॥" "गौरी गौरी ये गं आई, तुझ्या चरणी मस्तक ठेवू। अखंड सौभाग्य लाभो आम्हा, अशी तुला विनवणी करू॥" "श्रावण आला हिरवा गार, दारी फुलला मोगरा। मंगळागौरीच्या ओव्यांनी, भरला आनंद सारा॥" ...
ब्राइडल ॲक्सेसरीज ₹ 3000 ते ₹ 6000 च्या आत नवरीच्या सुंदर लुकसाठी बजेट फ्रेंडली पर्याय आजकाल उपलब्ध आहेत . लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. या दिवशी प्रत्येक वधूला सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण दिसायचे असते. यासाठी फक्त चांगले कपडेच नाहीं तर इतर गोष्टी म्हणजे दागिने, मेकअप चे साहित्य अश्या योग्य ॲक्सेसरीज देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. मात्र प्रत्येक वेळेस हजारो रुपयांचा खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की ₹ 3000 ते ₹ 6000 च्या आत सुंदर आणि स्टायलिश ब्राइडल ॲक्सेसरीज कशा सिलेक्ट करायच्या 1. ज्वेलरी सेट (Necklace Set) वधूच्या लुकमध्ये नेकलेस हा सर्वात महत्वाचा भाग असतो. आजकाल बाजारात आर्टिफिशियल ज्वेलरीचे खूप सुंदर सेट ₹ 1000 ते ₹ 2000 मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत . ...