मंगळागौरीच्या ओव्या महाराष्ट्रामध्ये मंगळागौर हा स्त्रियांचा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानला जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया देवी गौरीची पूजा करतात. पूजनानंतर फुगड्या, झिम्मा, विविध पारंपरिक खेळ आणि ओव्या परंपरा असून रात्रभर कार्यक्रम केला जातो . मंगळागौरीच्या ओव्या या महाराष्ट्राच्या लोकसाहित्याचा अमूल्य ठेवा आहेत. या ओव्यांमधून स्त्रियांच्या भावना, श्रद्धा, नातेसंबंध आणि सांस्कृतिक परंपरा व्यक्त होतात. मंगळागौरीच्या ओव्यांमध्ये देवी गौरीची स्तुती, संसारातील सुखाची कामना, माहेर-सासरचे प्रेम, निसर्गाचे सौंदर्य आणि स्त्रियांच्या जीवनातील विविध अनुभवांचे सुंदर चित्रण आढळते. उदाहरणार्थ, पुढील ओव्या आजही अनेक ठिकाणी म्हटल्या जातात— "आली आली मंगळागौर, सोन्याच्या पायघड्या घालून। गौरी आली घरोघरी, सुख-समृद्धी घेऊन॥" "गौरी गौरी ये गं आई, तुझ्या चरणी मस्तक ठेवू। अखंड सौभाग्य लाभो आम्हा, अशी तुला विनवणी करू॥" "श्रावण आला हिरवा गार, दारी फुलला मोगरा। मंगळागौरीच्या ओव्यांनी, भरला आनंद सारा॥" ...
लग्नातील रुखवत:- परंपरा, महत्त्व महाराष्ट्रीयन लग्नातील रुखवत म्हणजे काय? त्याचे महत्व , पारंपरिक वस्तू आणि आधुनिक आयडिया जाणून घ्या या सविस्तर लेखात ! भारतीय लग्नसमारंभ म्हणजे एक सुंदर विधी आणि आनंदसोहळा !!! पण त्याचबरोबर हा सोहळा परंपरा, संस्कृती आणि भावनांचा सुंदर संगम असतो. महाराष्ट्रात विशेषतः आढळणारी एक महत्त्वाची आणि आकर्षक परंपरा म्हणजे "रुखवत" रुखवत हा फक्त वस्तूंचा देखावा नसून तो नववधूच्या नवीन आणि मंगलमय आयुष्याची सुरुवात, कुटुंबाचे प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादाचे प्रतीक असते . रुखवत म्हणजे लग्नाच्या वेळी नववधूला तिचे आई वडील पुढील आयुष्यासाठी आवश्यक वस्तू प्रेमाने देतात . या वस्तू कल्पक रीतीने सजावट करून लग्नात मांडण्यात येतात त्यालाच रुखवत म्हणतात . या वस्तूंमध्ये हस्तकला, घरगुती साहित्य, गोड पदार्थ, सजावटीच्या वस्तू आणि काही उपयोगी वस्तूंचा समावेश असतो. या सर्व वस्तू आकर्षक पद्धतीने मांडल्या जातात जेणेकरून लग्नाला आलेले पाहुणे त्या पाहू शकतील. पूर्वीच्या काळात रुखवतामध्ये मुलीने स्वतः बनवलेल्या वस्तूंना विशेष महत्त्व दिले जा...