लग्नातील रुखवत:- परंपरा, महत्त्व
पण त्याचबरोबर हा सोहळा परंपरा, संस्कृती आणि भावनांचा सुंदर संगम असतो. महाराष्ट्रात विशेषतः आढळणारी एक महत्त्वाची आणि आकर्षक परंपरा म्हणजे "रुखवत"
रुखवत हा फक्त वस्तूंचा देखावा नसून तो नववधूच्या नवीन आणि मंगलमय आयुष्याची सुरुवात, कुटुंबाचे प्रेम आणि त्यांच्या आशीर्वादाचे प्रतीक असते.
रुखवत म्हणजे लग्नाच्या वेळी नववधूला तिचे आई वडील पुढील आयुष्यासाठी आवश्यक वस्तू प्रेमाने देतात.
या वस्तू कल्पक रीतीने सजावट करून लग्नात मांडण्यात येतात त्यालाच रुखवत म्हणतात.
या वस्तूंमध्ये हस्तकला, घरगुती साहित्य, गोड पदार्थ, सजावटीच्या वस्तू आणि काही उपयोगी वस्तूंचा समावेश असतो. या सर्व वस्तू आकर्षक पद्धतीने मांडल्या जातात जेणेकरून लग्नाला आलेले पाहुणे त्या पाहू शकतील.
पूर्वीच्या काळात रुखवतामध्ये मुलीने स्वतः बनवलेल्या वस्तूंना विशेष महत्त्व दिले जात असे. यामुळे तिच्या कौशल्याचे प्रदर्शन होत असे.
रुखवताचे सांस्कृतिक महत्त्व
रुखवताला केवळ सजावटीचा भाग म्हणून पाहिले जात नाही, तर त्याला खोल सांस्कृतिक आणि भावनिक अर्थ आहे.
प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक – वधूच्या कुटुंबाकडून तिच्यासाठी केलेली तयारी
आशीर्वाद – नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा
कौशल्य प्रदर्शन – वधूच्या हस्तकलेचे दर्शन
परंपरेचे जतन – पिढ्यानपिढ्या चालत आलेली संस्कृती
पूर्वी रुखवतामध्ये घरगुती वापराच्या वस्तू जास्त दिल्या जात , कारण नवीन लग्न झालेल्य
जोडप्याला नवीन संसार सुरू करताना त्या उपयोगी पडत.
रुखवतामध्ये कोणत्या वस्तू असतात?
रुखवतामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. कुटुंबाची परंपरा, बजेट आणि आवडीनुसार यामध्ये बदल होऊ शकतो.
भरतकाम (embroidery ) केलेले कपडे/रूमाल / तोरण
पेंट केलेले भांडे किंवा ट्रे, पैंटिंग्स , सिरॅमिक च्या वस्तू.
विणकाम
वॉल हॅंगिंग
या वस्तूंमुळे रुखवताला एक खास पारंपरिक स्पर्श मिळतो.
2. गोड पदार्थ आणि स्नॅक्स
* लाडू
* करंजी
* अनारसे
* चकली
* चिवडा पॅकेट्स
हे पदार्थ सुंदर पद्धतीने सजवून ठेवले जातात.
3. घरगुती साहित्य
* स्टील/तांब्याची भांडी
* मसाल्याचे डबे
* स्टोरेज कंटेनर
हे नव्या संसारासाठी उपयुक्त असतात.
4. सजावटीच्या वस्तू
* कृत्रिम फुले
* दिवे आणि पणत्या
* शोपीसेस
* नावाचे बोर्ड
5. भेटवस्तू
* साड्या
* बेडशीट्स
* ज्वेलरी बॉक्स
रुखवत कसे मांडले जाते?
रुखवताची मांडणी ही खूप महत्त्वाची असते. सुंदर कापड, फुले, लाईट्स आणि पार्श्वभूमी वापरून आकर्षक पद्धतीने वस्तू ठेवतात. आजकाल थीम बेस्ड रुखवत खूप फेमस आहेत .
* पारंपरिक मराठी थीम
* फ्लॉवर थीम
* रॉयल थीम
* मिनिमल थीम
यामुळे रुखवत अधिक आकर्षक बनतो .
आधुनिक काळातील रुखवत ट्रेंड
आजच्या काळात रुखवतामध्ये अनेक नवीन आणि आधुनिक बदल झाले आहेत:
1. थीम आधारित रुखवत
संपूर्ण रुखवत एकाच थीमनुसार सजवले जाते. उदा. फ्लॉवर डेकोरेशन्स , बलून डेकोरेशन , etc.
2. पर्सनलाइज्ड वस्तू ( customized)
नावाचे बोर्ड
फोटो फ्रेम्स
कपल गिफ्ट्स
3. इको-फ्रेंडली रुखवत
पर्यावरणपूरक वस्तू
कमी प्लास्टिक वापर
4. रेडीमेड वस्तू
व्यस्त जीवनशैलीमुळे लोक ऑनलाइन वस्तू खरेदी करतात.
5. सोशल मीडिया प्रभाव
Instagram आणि YouTube मुळे नवीन डिझाईन आणि आयडिया मिळतात.
आजच्या काळातील रुखवताचे महत्त्व
रुखवत आजही महत्त्वाचे आहे कारण:
* ती एक छान परंपरा आहे .
* कलेला प्रोत्साहन मिळते .
* वस्तू बनवल्याने समाधान आणि जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो .
* सुंदर आठवणी तयार होतात
सुंदर रुखवत तयार करण्यासाठी टिप्स
आधीपासून प्लॅनिंग केले तर बजेट मध्ये चांगला रुखवत होऊ शकतो.
एक थीम ठरवली जाते . पारंपरिक आणि आधुनिक यांचा बॅलन्स ठेवला तर ते देखील छान दिसते .
सजावटीवर लक्ष द्यावे आणि अर्थपूर्ण वस्तू निवडणे . अश्या सगळ्या गोष्टीने पण हा सोहळा अगदी आनंददायी होऊ शकतो.
निष्कर्ष
रुखवत ही एक सुंदर परंपरा आहे जी संस्कृती, कला आणि भावना यांचा संगम आहे . ती केवळ वस्तूंची मांडणी नसून वधूच्या नव्या आयुष्याची सुरुवात आणि कुटुंबाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. काळानुसार त्यात बदल झाले असले तरी त्याचे महत्त्व आजच्या काळात अजूनही कायम आहे.
सुंदर आणि मनापासून तयार केलेले रुखवत म्हणजे आनंदाची , प्रेमाचे प्रतीक असते .
प्रत्येकाच्या मनात कायमची आठवण ठेवते .
ऑफलाईन मार्केट मध्ये देखील भरपूर व्हरायटी मिळू शकते . वस्तू बनवण्यासाठी देखील मटेरियल मिळते.
online अव्हेलेबल असणाऱ्या काही रुखवताच्या वस्तू !



Comments
Post a Comment