Skip to main content

Featured post

How is Paithni Saree made? पैठणी साडी कशी बनते?

पैठणी साडी म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे . पैठणी साड्यांची मोहक रंगसंगती, आकर्षक नक्षीकाम आणि उत्कृष्ट हस्तकलेमुळे तिला "साड्यांची महाराणी" असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील महिलांच्या आयुष्यात पैठणीला विशेष स्थान आहे. लग्नसमारंभ, धार्मिक उत्सव, मुंज, डोहाळजेवण किंवा इतर शुभकार्यांमध्ये पैठणी साडी नेसणे  हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचे आहे . मात्र  ही सुंदर साडी तयार होण्यासाठी अनेक r दिवसांची मेहनत, कुशल कारागिरांचे कौशल्य आणि अत्यंत बारकाईने केलेले काम लागते.   पैठणीचा इतिहास महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील  पैठण या शहरावरून पैठणी साडीचे नाव  पडले आहे.  प्राचीन काळातीलसातवाहन राजांच्या काळात पैठण हे व्यापार आणि संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र होते. त्या काळात येथील रेशमी वस्त्रे आणि हातमागावरील साड्या देश-विदेशात प्रसिद्ध होत्या.   काही काळानंतर  पैठणीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि  ही साडी "पैठणी" म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली.   पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया आणि श्रीमंत कुटुंबातील महिला पैठणी नेसत असत. ...

Wedding Shopping लग्नाची खरेदी

 

ब्राइडल ॲक्सेसरीज


₹ 3000 ते  ₹ 6000   च्या आत  नवरीच्या  सुंदर लुकसाठी बजेट फ्रेंडली पर्याय आजकाल उपलब्ध आहेत .




Wedding Shopping लग्नाची खरेदी

 लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. या दिवशी प्रत्येक वधूला सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण दिसायचे असते. यासाठी फक्त चांगले कपडेच   नाहीं    तर इतर गोष्टी म्हणजे दागिने, मेकअप चे साहित्य अश्या  योग्य ॲक्सेसरीज    देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. मात्र प्रत्येक वेळेस हजारो रुपयांचा खर्च करणे शक्य नसते.

त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की ₹ 3000 ते  ₹ 6000 च्या आत सुंदर आणि स्टायलिश ब्राइडल ॲक्सेसरीज  कशा सिलेक्ट करायच्या


1. ज्वेलरी सेट (Necklace Set)

वधूच्या लुकमध्ये नेकलेस हा सर्वात महत्वाचा भाग असतो. आजकाल बाजारात आर्टिफिशियल ज्वेलरीचे खूप सुंदर सेट ₹ 1000   ते ₹ 2000 मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत .


Wedding Shopping लग्नाची खरेदी
 
                                                                     


Wedding Shopping लग्नाची खरेदी


हे  नेकलेस ऑनलाईन मिळू शकतात 

उदा. कुंदन ज्वेलरी ,ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, टेंपल ज्वेलरी (दक्षिण भारतीय स्टाइल) , मोत्याचे दागिने इ .


Wedding Shopping लग्नाची खरेदी

                                                     मोत्यांचा ज्वेलरी सेट    


                   
           आपल्या साडी किंवा लेहंग्याच्या रंगाशी मॅचिंग  असा नेकलेस आणि  इतर ॲक्सेसरीज हेअर क्लिप्स ,मेकअप , ज्वेलरी इ . आपण घेऊ शकतो .

 

 2. इअररिंग्स (Earrings)

नेकलेससोबत मॅचिंग इअररिंग्स खूप महत्त्वाचे असतात.

किंमत:

₹200 ते ₹800 मध्ये खूप छान डिझाइन्स मिळतात

लोकप्रिय प्रकार:

झुमके   , चांदबाली

स्टड्स (Minimal look साठी

                 
Wedding Shopping लग्नाची खरेदी

                                                                                                            झुमके  


Wedding Shopping लग्नाची खरेदी

                                                                        मोत्याचे कानातले


Wedding Shopping लग्नाची खरेदी
                                                        

टिप: जर नेकलेस भारी असेल तर हलके इअररिंग्स निवडल्यास छान दिसते .

 

3. बांगड्या (Bangles)

नवरीच्या हातात खास लग्नाच्या बांगड्या ( चुडा) असतो . 

पण त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या बँगल्स किंवा कंगन घालू शकतात . मेटल बांगड्या, स्टोन वर्क बांगड्या ई.

Wedding Shopping लग्नाची खरेदी



                                                                       बँगल्स सेट

                                                               

Wedding Shopping लग्नाची खरेदी
                                                                                 मोती बँगल्स


बजेट:

₹200 ते ₹700 मध्ये सुंदर सेट मिळतो.

टिप: लाल, हिरवा आणि सोनेरी रंगाचे कॉम्बिनेशन नेहमीच क्लासिक दिसते.


 4. मांगटिक्का (Maang Tikka)

काही लग्नपद्धतीपढे आजकल मांगटिका सुद्धा घालतात . इअररिंग्ज , नेकलेस , अंगठी , बांगड्या आणि त्यांबरोबर मांगटिका देखील घालतात .

विशेष करून रिसेप्शन ला असा लुक असतो.   मांगटिका वधूच्या चेहऱ्याला एक खास आकर्षण देतो.

किंमत:

₹150 ते ₹600

प्रकार:

सिंगल टिक्का, मल्टी-लेयर टिक्का

 टिप: जर तुम्ही मिनिमल लुक हवा असेल तर छोटा टिक्का निवडा.

 

 5. नथ (Nath)

महाराष्ट्रीयन वधूसाठी नथ हा खूप महत्वाचा दागिना आहे .


Wedding Shopping लग्नाची खरेदी

  

Wedding Shopping लग्नाची खरेदी

किंमत:

₹100 ते ₹500

प्रकार:

यामध्ये मोती, गोल्डन मणी , खडे अश्या प्रकारच्या नथ मार्केट मध्ये मिळतात .

 टिप: तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार नथ निवडा.

 

 6. हेअर  एक्सेसरीज 

केस सजवण्यासाठी विविध प्रकारच्या ऍक्सेसरीज वापरता येतात. यासाठी मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहे. यामुळे कमी वेळात अतिशय आकर्षक, सुंदर हेअरस्टाईल करता येते .  गजरा (फुलांचा किंवा आर्टिफिशियल), हेअर पिन्स, जूडा /अंबाडा    ऍक्सेसरीज ई.


Wedding Shopping लग्नाची खरेदी


बजेट:

₹100 ते ₹400

टिप: फुलांचा गजरा नेहमीच फ्रेश आणि पारंपरिक लुक देतो.

 

 7. पैंजण (Anklets)

पैंजण वधूच्या लुकमध्ये एक वेगळीच शोभा आणतात. यामध्ये पारंपरिक पैंजण अव्हेलेबल आहेतच . पण आजकाल स्टोनचे , गोल्डन , ऑक्सिडाइज्ड  इ. अनेक प्रकार पाहायला मिळतात. 

किंमत:

₹200 ते ₹600

 टिप: साधे आणि नाजूक (एलिगंट ) पैंजण निवडा.

 

 8. क्लच किंवा पर्स

वधूला छोट्या वस्तू ठेवण्यासाठी एक सुंदर क्लच/ छोटी पर्स आवश्यक असते.  यामध्ये तर अक्षरशः हजारो व्हरायटी मिळतात .

किंमत:

₹300 ते ₹800

 टिप: आपल्या आउटफिटशी मॅच होणारा क्लच किंवा पर्स  निवडा.

इथे अगदी जनरल माहिती दिली आहे पण तुम्ही 5000 किंवा त्यापेक्षा जास्त बजेट असेल तरी त्यानुसार खरेदी करू शकता.


🌟 काही महत्वाच्या टिप्स

✔️   खरेदी करताना नेहमी क्वालिटी तपासा

✔️ ऑनलाइन खरेदी करत असाल तर रिव्ह्यू वाचा

✔️ खूप जास्त ऍक्सेसरीज वापरू नका (ओव्हरलुक टाळा)

✔️ आपल्या साडीशी किंवा   ड्रेसशी कलर मॅचिंग करा

✔️ हे सर्व घेताना कंफर्ट पण तितकाच महत्वाचा आहे, त्यानुसार निडून खरेदी करावी.

 

निष्कर्ष

आजच्या काळात सुंदर दिसण्यासाठी महागड्या ज्वेलरीची गरज असतेच असे नाही. योग्य प्लॅनिंग आणि स्मार्ट शॉपिंग केल्यास ₹3000 ते 5000 च्या आत देखील एक परफेक्ट ब्राइडल लुक मिळू शकतो.

तुमच्या खास दिवशी आत्मविश्वास आणि आनंद हेच तुमचे खरे सौंदर्य आहे. योग्य अॅक्सेसरीज त्यात नवरीचे सौन्दर्य अजूनच खुलवतात .

 

Note - Products shown in images earns commission


Comments

Popular Post

Mehndi Event मेंदी समारंभ - एक आनंदोत्सव

                                                                  मेंदी - भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग भारतीय संस्कृतीत, विशेषतः लग्न समारंभात,साखरपुडा , आता तर प्रत्येक समारंभाला मेंदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. मेंदी केवळ एक कला प्रकार नसून, मेंदी शुभ मानली जाते आणि आनंद, प्रेम व सौभाग्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. लग्नघरात मेंदीचा कार्यक्रम हा एक अविस्मरणीय सोहळा असतो, जिथे वधूच्या हातावर आणि पायांवर नक्षीदार काढली जाते. तसेच  वधू वरांकडील   स्त्रियांच्या मुलींच्या अगदी लहानापासून मोठ्या वयापर्यंतच्या   स्त्रियांच्या मुलींच्या हातावर मेंदी काढली जाते . ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व मेंदीचा इतिहास खूप जुना आहे. वैदिक काळापासून मेंदी चा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून केला जात होता असे मानले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या, मेंदी ला एक पवित्र वनस्पती मानले जाते. अनेक परंपरांनुसार, मेंदी ...

How is henna powder prepared? मेंदी पावडर  कशी बनवली जाते ?

              भारतात मेंदी पावडर कशी तयार होते याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे: भारतात,विशेषतः राजस्थान, गुजरात आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये मेंदीची  मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. १. लागवड आणि कापणी: मेंदी हे एक झुडूपवर्गीय पीक आहे. याला उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. मेंदीची लागवड बियांपासून किंवा कलमांद्वारे केली जाते. मातीची चांगली मशागत करून त्यात सेंद्रिय खत मिसळून मेंदीची रोपे लावली जातात. रोपे लावल्यानंतर नियमित पाणी आणि खते दिली जातात. मेंदीची कापणी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात केली जाते. कुशल कामगार मेंदीची पाने काळजीपूर्वक कापतात. कापणीनंतर, पाने १८-२० तास उघडी ठेवली जातात आणि नंतर ढीग करून त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना काही काळ तसेच ठेवले जाते. २. पाने सुकवणे: कापणी केलेल्या मेंदीच्या पानांना सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाशात सुकवले जाते. त्यांना थेट कडक उन्हात सुकवल्यास त्यांचा रंग आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. पाने पूर्णपणे कोरडी होईपर्यंत पसरवून ठेवली जातात, जेणेकरून त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जाईल. पाने पूर्णपणे सु...

Main Mehndi Designs मेहंदी डिझाईन्सचे काही प्रमुख नमुने

मेंदीमधील सर्वात सामान्य आणि सुंदर नमुने !! फुले आणि पाने (Floral and Leaf Motifs) : यामध्ये विविध प्रकारची फुले (कमळ, गुलाब, सूर्यफूल) आणि पाने (आंब्याची पाने) यांचा समावेश असतो. वेली (Vines/Creepers):   नाजूक आणि सुंदर वेली हातावर किंवा पायावर काढल्या जातात, ज्यामुळे एक मनमोहक लुक मिळतो मंडाला (Mandala):   यामध्ये हातावर मेंदी काढताना ,तळहाताच्या मध्यभागी एक वर्तुळाकार डिझाईन किंवा नक्षी काढली जाते,जी हळूहळू बाहेरच्या दिशेने मोठी होत जाते. हे डिझाईन खूप आकर्षक दिसते. कळस / कैरी (Paisley/Kairi): कळस किंवा कैरी हि डिझाईन मेंदी काढताना वापरली जातेच .  आंब्याच्या आकारासारखी दिसणारी कोयरी हा प्रकार भारतीय मेंदी मध्ये खूप प्रसिद्ध आहे. जाळी (Net/Jaali):   मेंदी काढताना अगदी बारीक डिझाईन काढायची असल्यास ,हातावर किंवा बोटांवर काढलेली जाळीदार डिझाईन खूप सुंदर आणि खूप कलाकुसरीची असते. अतिशय चिकाटीने हे डिझाईन काढले जाते . मोर (Peacock):  मोराची नक्षी हि मेंदी मध्ये विशेषतः भारतीय मेंदी डिझाईन मध्ये प्रसिद्ध आहे . सर्वांनाच हि डिझाईन ...

Types of Mehndi मेंदीचे प्रमुख प्रकार

  मेंदीचे प्रमुख प्रकार (Types of Mehndi):   1.  भारतीय मेंदी (Indian Mehndi):  ही सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक मेंदी आहे. यात डिझाईन्स खूप बारीक आणि कलाकुसरीच्या असतात, ज्यामुळे हात  पूर्णपणे भरलेले दिसतात. यामध्ये मोर, फुले, पाने, वेली, देवी-देवतांच्या आकृती, शुभ चिन्ह (उदा. स्वस्तिक, ओम) यांचा समावेश असतो.   नववधूंसाठी पूर्ण हातावर आणि पायांवर मेंदी काढली जाते .      प्रसिद्ध डिझाईन्स:  ब्राइडल मेहंदी, पारंपरिक जाळीदार डिझाईन्स, मोर-नक्षी, कैरी पॅटर्न.   2.  अरेबिक मेंदी (Arabic Mehndi):   ही मेंदी वेलीच्या (वेल ) स्वरूपात काढली जाते. यात ठळक रेषा आणि मोकळ्या जागा (space) अधिक असतात. पूर्ण हात भरण्याऐवजी, एका बोटापासून सुरू होऊन मनगटापर्यंत किंवा हाताच्या एका बाजूने सुंदर मेंदी ची नक्षी  हातावर  काढली जाते . ही डिझाईन पटकन काढता येते आणि दिसायला आकर्षक दिसते.      प्रसिद्ध डिझाईन्स:  फुलांच्या आणि पानांच्या वेली, ठळक भूमितीय आकार, मोराची नक्षी.   3.  मोरोक्कन मेंदी (Moroccan ...

Stylish Mehndi Dress मेंदी ड्रेस: सौंदर्य, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम

  मेंदी ड्रेस:   सौंदर्य, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम   भारतीय विवाहसोहळ्यात मेंदीचा कार्यक्रम हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा भाग असतो. या समारंभात वधूपासून ते नातेवाईकांपर्यंत सर्वच जण खास तयारी करतात आणि पारंपरिक वेशभूषेत नटून , आवडीप्रमाणे ड्रेस घालून येतात. मेंदी ड्रेस केवळ एक पोशाख नसून, तो   सौंदर्य, परंपरा आणि आधुनिकतेचा एक अनोखा संगम दर्शवतो. ह्या सोहळ्यची रंगत त्यामुळे अजूनच वाढते .  लोकल मार्केट मध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध असतात . पण हे ड्रेस ऑनलाईन देखील विकत घेता येतात . आजकाल, मेंदी ड्रेस केवळ वधूसाठीच नव्हे तर तिच्या मैत्रिणी, बहिणी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसाठी ही     एक     फॅशन      स्टेटमेंट      बनला     आहे . वधूचा मेंदी ड्रेस : मेंदीच्या दिवशी सर्व लक्ष वधूच्या ड्रेसकडे असते. पूर्वी वधू फक्त हिरव्या रंगाचे कपडे परिधान करत असे, पण आता फॅशनच्या बदलत्या ट्रेंडनुसार विविध रंग आणि शैलींचा स्वीकार केला जात आहे. वधूचा मेंदी ड्रेस आरामदायक आणि सुं...